कणकवली मतदारसंघात नवाज खानींची हवा

वैभववाडी तालुक्यामध्ये व्यापारी, यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांच्या घेतल्या भेटी
मतदारांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची नवाज खनींची प्रतिक्रिया
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नवाज खनीं यांनी वैभववाडी तालुक्यामध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेत असताना तालुक्याच्या ठिकाणी देखील अनेक व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिकांना भेटून मतदान करण्याचे आवाहन नवाज खनीं यांच्याकडून केले जात आहे. कणकवली मतदारसंघात नवाज खनीं यांनी अपक्ष उमेदवार असून देखील त्यांनी आपल्या नावाची हवा केली आहे. नवाज खनीं यांच्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





