शशिकांत महादेव घाडीगांवकर – समाजातील एक धैर्यवादी तारा लोप पावला

आचरा–अर्जुन बापर्डेकर


घाडीगांवकर समाज संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी, संस्थेच्या वधुवर सुचक मंडळाचे प्रमुख श्री शशिकांत महादेव घाडीगांवकर, वय ८३ वर्षे,गांव गोठणे, यांचे अल्पशा आजाराने वरळी येथिल त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

सिंधुदुर्गातील गोठणे गावातुन मुंबईत आलेले शशिकांत घाडीगावकर मिल कामगार म्हणुन नोकरीला लागले. वरळीतील जनता कॉलनीत राहत असताना त्यावेळच्या कम्युनिष्ट विचारसरणीत डांगे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्यातील कार्यकर्ता उदयांस आला. परळ लालबाग करत ते वरळीत वास्तव्यात होते व वरळी,लालबाग, काळाचौकी हि त्याची कर्मभुमी राहिली. विक्रमी कार्यकाळ नगरसेवक राहिलेले कॉम्रेड मनीशंकर कवठे यांच्या खांद्याला खादा लावुन त्यांनी काम पाहिले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई यासंस्थेचा कार्यकर्ता पासुन त्यांनी विभागासह विविध समित्यांची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली. संस्थेने १९८० साली स्थापन केलेल्या घाडीगांवकर वधुवर सुचक मंडळाचे काम अविरतपणे करुन हजोरो लोकांचे संसार सुखी केले. माझ्या सारखे असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडविले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगा, दोन सुना,मुलगी,जावई व नातवंडे आणि शौकाकुल समाजबंधु भगिनी आहेत, असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई यासंस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष घन:श्याम स गांवकर यांनी केले.

error: Content is protected !!