संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ तोंडवली-बावशी येथे गाव बैठक

बावशी शाखाप्रमुख पदी दीपक कांडर यांची नियुक्ती

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ तोंडवली-बावशी येथे गाव बैठक संपन्न झाली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तोंडवली-बावशी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊन आपले महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना विजयी करूया असे आव्हाहन यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. यावेळी बावशी शाखाप्रमुख पदी दीपक कांडर यांची नियुक्ती करण्यात आली. सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, मज्जीद बटवाले, तात्या निकम, अतुल सदडेकर, इमान नावळेकर, आबू मेस्त्री, हेमंत कांडर, दीपक कांडर आदी शिवसैनिक व महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!