ऐन दिवाळीत कणकवलीत आरबी बेकरी सह मेडिकल बेचिराख

शुक्रवारी पहाटेच्या सुमाराची घटना

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नागरिकांची घटनास्थळी धाव

तीन अग्निशामन बंबा द्वारे आग आटोक्यात

कणकवली शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरी ला आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आर बी बेकरी जळून पूर्णता बेचिराख झाली. यासोबत तेथे बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसला. घटनेची माहिती मिळतात कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली. आगीचा भडका एवढा जोरात होता की या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी पडली. कणकवली नगरपंचायत चा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर कुडाळ एमआयडीसी व मालवण नगरपंचायत चां बांब बोलावण्यात आला. त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन आदिवासी ही दुकाने अक्षरशा बेचिराख झाली. ही घटना आज शुक्रवारी पहाटे चार वाजता घडली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!