महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद
देवगड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत मतदारांना केले आवाहन
तुमचा हक्काचा आमदार म्हणून निवडून द्या पारकर यांचे आवाहन
कणकवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड तालुक्यातील प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवगड तालुक्यात ठीक ठिकाणी गृहभेटी देत संदेश पारकर यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. तुमचा हक्काचा उमेदवार म्हणून मतदान करा. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची संधी द्या. असे आवाहन श्री पारकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळनकर, देवगड नगरसेवक बुवा तारी आदी उपस्थित होते. देवगड तालुक्यात अनेक गावांमध्ये भेटी देत असताना संदेश पारकर यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन देखील केले.
देवगड प्रतिनिधी