कुंभारमाठ गावामध्ये झालेल्या पक्षप्रवेश राणे समर्थकांच्या पोटात गोळा आणनारा!

महिला शाखाप्रमुख सुवर्णा भोगावकर यांची टीका

दिलीप सांगवेकर यांची जनतेत पत किती हे अगोदर त्यांनी पाहावे

कुंभारमाठ गावात झालेला पक्षप्रवेश हा भाजप व पर्यायाने राणे समर्थक यांच्या पोटात गोळा आणणारा असून, यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. याचाच प्रत्यय दिलीप सांगवेकर यांनी केलेली टीका सांगून जाते. तसेच आपण भाजपचे बुथ अध्यक्ष म्हणून मिरवत असताना माजी सरपंच तृप्ती लंगोटे या भाजपच्या महिला मालवण तालुका अध्यक्ष व मालवण तालुक्यातील प्रथम महिला भाजप सरपंच होत्या हे आपण विसरलात असे वाटते. त्यामुळे पक्षाविषयी माहिती नसलेल्या व ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये जनाधार नसलेल्या दिलीप सांगवेकर यांनी टीका करणे म्हणजे त्यांच्या मागचा बोलावता धनी कोणीतरी वेगळाच आहे हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे दिलीप सांगवेकर यांनी आधी आपली जनतेत किती पत आहे हे ठरवावे व त्यानंतर इतरांना सल्ले द्यावे. असा टोला महिला शाखाप्रमुख सुवर्णा भोगावकर यांनी लगावला आहे.

मालवण प्रतिनिधी

error: Content is protected !!