हळवल शिवजयंती उत्सव मंडळाचा आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार डॉ दिलीप घाडी यांना

मंडळाच्या वतीने पुरस्काराचे केले वितरण

कणकवली तालुक्यातील हळवल येथे शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 35 वर्षाची परंपरा जपत या वर्षी देखील धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंती उत्सव हळवल यांच्या वतीने देण्यात दरवर्षी तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. प्रति वर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले होते. सकाळी धार्मिक विधींनी या उत्सवाला सुरवात झाली सायंकाळच्या सत्रात हरिपाठ, भजने व मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. दरवर्षी या मंडळामार्फत दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार डॉ दिलीप घाडी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, राजेंद्र राणे, मधुकर सावंत, ग्रामपंचायत सदस्य रोहित राणे, सुरज राणे, सचिन ठाकूर, विजय परब, आप्पा ठाकूर, संदेश राणे, विकास गुरव, योगेश राणे, सुभाष राणे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!