वैभव नाईक 24 तारीख ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

कुडाळ – ठाकरे शिवसेनेचे आमदार आणि कुडाळ-मालवण मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक हे २४ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉलच्या पटांगणावर सभा घेवून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.