आचरा परीसराला पावसाने झोडपले

त्रिंबक येथे दुकानाच्या इमारतीवर वीज पडून नुकसान


आचरा-अर्जुन बापर्डेकर
गुरुवारी रात्री गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपून काढले.भात नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले.तर त्रिंबक येथील
विवेक नंदकुमार त्रिंबककर यांच्या दुकानावर वीज पडून इमारतीसह विद्यूत उपकरणांचे मोठे नुकसान झाले.
गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या गडगडाटात दुकानाच्या बाजूला असलेल्या सागाच्या झाडालगत पडलेल्या वीजेची तिव्रता येवढी होती की जमिनीला खड्डा पाडत वीज दुकानाच्या इमारतीच्या भिंतीतून आत गेली. यात
विद्यूत मिटर वायरींग जळून त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही छिद्र पडून दुकानाच्या पत्र्यांनाही तडे गेले होते.आचरा येथेही आचरा तिठा ते देवगड रोड लगतच्या रहिवाशांच्या घरातील, दुकानातील इलेक्ट्रीक उपकरणे, इन्व्हर्टर जळून मोठे नुकसान झाले.
विद्यूत मंडळालाही फटका
मुसळधार पावसासह आलेल्या गडगडाटाने विद्यूत मंडळाला चांगलाच फटका बसला.यामुळे आचरा पंचक्रोशिचा वीज पुरवठा खंडित झाला होता.शुक्रवारी सकाळी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्यूत मंडळाचे सहायक अभियंता अनिल मठकर आणि विद्यूत कर्मचारी कसोशिने प्रयत्न करत होते.
भात नाचणी शेती धोक्यात
गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस पडत असल्याने हाता तोंडाशी आलेली शेती धोक्यात आली आहे.यात
भात नाचणी शेतीसह झोडून ठेवलेला भाताचा सरला भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!