यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन

कणकवली महाविद्यालयात आयोजन

कणकवली/प्रतिनिधी

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र कणकवली व विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा सांस्कृतिक युवा महोत्सव कणकवली महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या महोत्सवात कोल्हापूर ,सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे सचिव श्री विजयकुमार वळंजू व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्यालयाची संचालक डॉ. आर. व्ही.कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.”कला गुण विकसित होण्यासाठी युवक महोत्सव ही पर्वणी ठरते. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम राबविले पाहिजेत” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विजयकुमार वळंजू यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सौ .राजश्री साळुंखे यांनी “बहिस्थ विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठीचा हा महोत्सव अत्यंत मोलाचा असून ” महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ही विद्यार्थ्यांसाठी ही सूसंधी असल्याचे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक महोत्सवाचे समन्वयक प्रा.हरिभाऊ भिसे, केंद्र संयोजक प्रा. मनोज कांबळे, पर्यवेक्षक प्रा.महादेव माने, वरिष्ठ महाविद्यालयातील डॉ. राजेंद्र मुंबरकर डॉ.सोमनाथ कदम, डॉ. बी.एल. राठोड, कार्यालय अधीक्षक श्री संजय ठाकूर , कनिष्ठ लिपिक श्री संजय राणे, केंद्र सहाय्यक वैभव राणे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, सांगली व कोल्हापुर विभागातील कलावंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा . मीनाक्षी सावंत यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य युवराज महालिंगे यांनी व्यक्त केले व शेवटी प्रा. हरीभाऊ भिसे यांनी मानले.

error: Content is protected !!