कणकवलीतील झालेल्या आरक्षण बचाव रॅली नंतर देवगड तळवडे बौद्धवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता आ.नितेश राणे यांनी

भाजप पक्ष आरक्षणाचे संरक्षण करू शकते हे आरक्षणवादी जनतेच्या लक्षात आल्याने पक्षप्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत.

कणकवली/प्रतिनिधी

कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय भीम ….. जय निम” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काच आहे ते कोणाला हिसकवू शकत नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून देवगड तालुक्यातील तळवडे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.

यावेळी संजय तळवडेकर, निखिल जाधव, शैलेश जाधव, सतीश जाधव, राजू जाधव, सुशांत तळवडेकर, अजित जाधव, नितीन जाधव, ज्योती जाधव – महिला समता महिला अध्यक्षा, विनया तळवडेकर – सचिव, अक्षता जाधव, सलोनी तळवडेकर, मनीषा जाधव, श्रुती तळवडेकर, मनीषा जाधव, निधी जाधव, विनिता जाधव, संगमी जाधव, रमेश जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!