गणेश राणे यांनी घेतली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट

सावंतवाडी प्रतिनिधी
मुंबई अंधेरी भागातील शिवसेना नेते गणेश राणे यांनी सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेऊन आगामी निवडणूक साठी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. गणेश राणे यांच्याकडे सोलापूर करमाळा या भागातील शिवसेनेची जबाबदारी आहे मुंबईत श्रीकांत सरमळकर यांच्या बरोबरीने श्री राणे यांनी काम केले आहे.गेले कित्येक वर्ष ते शिवसेनेचे काम करत आहेत. कणकवली येथील रहिवासी असलेले राणे यांनी आज सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.