स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत कणकवली वॉकीथॉन संपन्न

200 नागरिकांचा स्वच्छ व सुंदर कणकवली साठी पाच किलोमीटर सिटी वॉक

 देशभरामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान उत्साहात राबविले जात आहे. “संस्कार स्वच्छता, स्वभाव स्वच्छता” या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कणकवली नगरपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने कणकवली वॉकेथॉन: 2024 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये 200 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी कार्यक्रम स्थळी कणकवली नगरपंचायत कणकवली नूतन मुख्याधिकारी गौरी पाटील, प्रा. राजश्री साळुंखे चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली, प्राचार्य युवराज महालिंगे कणकवली कॉलेज, कणकवली, माननीय प्रशांत ठाकूर , प्रतीक माईनकर प्रतिनिधी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी कणकवली, माननीय झा, देठे प्रतिनिधी महाराष्ट्र बँक, कणकवली, प्रा. एम. माने पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय कणकवली, प्रा. हरिभाऊ भिसे, चेअरमन कणकवली अर्बन निधी लिमिटेड उपस्थित होते.

कणकवली शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी कणकवली नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नगरपंचायत प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी कणकवलीसाठी प्रयत्न करूया असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सर्व नागरिकांना केले.
मार्गदर्शन करताना प्रा. राजश्री साळुंखे म्हणाल्या की शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आनंदी आयुष्यासाठी स्वच्छता आणि उत्तम आरोग्य आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करत रहा. व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले की कणकवली शहर पर्यावरण संतुलित स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये कणकवली कॉलेज प्रशासन व विद्यार्थी अग्रस्थानी असतील आणि विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चितपणे कणकवली शहराला सर्वात सुंदर शहर अशी ओळख निर्माण करून देईल.
कणकवली वाक्यथॉन :2024 याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र बँक शाखा कणकवली, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी कणकवली, कणकवली अर्बन निधी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांनी मदत केली. प्रसंगी 200 सहभागी नागरिकांनी 5 Km वॉक पूर्ण करत, सिंगल युज प्लास्टिक टाळा, कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण बद्दल संदेश दिला. स्पर्धेतील 27 यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुरेश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर गावडे, प्रा. अदिती मालपेकर, प्रा. पूजा मुंज, स्वयंसेवक , नगरपंचायत कर्मचारी वर्षा कांबळे व इतर यांनी कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन प्रा. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजु आणि प्राचार्य युवराज महालिंगे यांचे मार्गदर्शनाखाली केले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!