विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण केल्यास यशस्वी व्हाल!

नाटळ सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष एन बी सावंत यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी आपणाला भविष्यात कोण बनायचे आहे हे प्रथम निश्चित केले पाहीजे. त्यानुसार आपले उद्धीष्ठ ठरवुन मार्गक्रमण केल्यास जिवनात निश्चितच यशस्वी व्हाल असा सल्ला यावेळी नाटळ सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष एन बी सावंत यांनी सोसायटीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत दहावी बारावी विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात मागदर्शन करताना दिला.
यावेळी नाटळ हायस्कूल मुख्याध्यापिका प्रणिता बांबूळकर, उपसरपंच पंढरिनाथ तायशेटे, तंटामुक समिती अध्यक्ष सुनिल पांगम, सोसायटि उपाध्यक्ष तुकाराम नाटळकर, शिक्षक दयानंद गावकर, संचालक किशोर परब, दशरथ सुतार, संतोष खरात, प्रतिभा कुडतरकर, दाजी गावकर, चंद्रकांत सुतार, मिलिंद डोंगरे, दिपक पांगम, डॉ चोडणेकर, दत्ताराम सुतार, गौरव सावंत व सभासद उपस्थित होते.
या सोसायटिच्या माध्यमातुन गावातील शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. जास्तीत जास्त लोकांनी सभासद होण्याचे आवाहन या वेळी सावंत यांनी केले. सोसायटि राबवित असलेले विविध उपक्रम स्तृत्य असुन ते सर्वांच्या उत्कर्षासाठी पोषक असल्याचे सांगूण सोसायटिच्या पुढील वाटचालीस नाटळ हायस्कुल मुखाध्यापिका प्रणिता बांबुळकर यांनी शुभेछा दिल्या.
सोसायटिने सलग तीन वर्षे बँक पूर्ण कर्ज फेड केल्याने जिल्हा बँकेतर्फे सत्कार ही करण्यात आला त्या बद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.सोसायटिने यावर्षा पासुन गावातील १० वी, १२ वी तसेच इतर कलेत उज्वल यश मिळवीलेल्या विद्यार्यांचा शैक्षणिक वस्तू देऊन सत्कार केला. यामध्ये ऋतुजा डोंगरे, सानिया सुतार, वैदेही सावंत, उत्कर्षा नार्वेकर, दुर्वांगी घाडीगावकर, केदार मेस्त्री, साक्षी गावकर यांचा सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे नुतन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनिल पांगम, पंढरिनाथ तायशेटे, प्रणिता बांबूळकर, राधिका कुडतरकर, विनय सुतार, संदिप सांगवेकर, गौरव सावंत तसेच विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी ९ टक्के लाभांश सोसायटी मार्फत देण्यात आला. सोसायटिने यावर्षी सुमारे सवाकोटी कर्जाचे वाटप करून गावात आर्थिक सुबक्ता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्या बद्दल सभासदांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्य केले आहे.
फोटो ओळी: नाटळ सह. सेवा सोसायटिच्या वतिने दहावी, बारावी व विविध कलेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एन बी सावंत, पंढरिनाथ तायशेटे, प्रणिता बांबूळकर, सुनिल पांगम उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!