एलआयसीच्या मालवण शाखेमध्ये काही आदर्श शिक्षकांचा सत्कार

1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा विमा सप्ताह म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो एलआयसी ने 69 व्या वर्षात पदार्पण केलं त्यानिमित्ताने संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यानिमित्ताने एलआयसी च्या मालवण शाखेमध्ये काही आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सिंधुदुर्गातील काही आदर्श शिक्षक उपस्थित होते. सौ मेघा गोगटे देशमुख, श्री.निशिकांत पराडकर, सौ अल्का विलास नारकर, सौ ज्योती बुवा तोरस्कर, सौ स्नेहा चंद्रशेखर बर्वे.यावेळी मालवण एलआयसी ब्रांच शाखाअधिकारी श्रीमती सतेजा बोवलेकर उपस्थित होत्या. तसेच विकास अधिकारी शैलेश पावसकर,विमा प्रतिनिधी एलआयसी अधिकारी श्री किरण पालव , श्री हरी कांबळे, श्री मंगेश अधांगळे,श्री कमलाकांत परब आणि इतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता

error: Content is protected !!