बापर्डे मधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपा मध्ये

आमदार नितेश राणेंकडून प्रत्येक देवगड दौऱ्यात ठाकरे गटाला धक्का

देवगड तालुक्यातील बापार्डे येथील संदीप तुकाराम घाडी उर्फ नाना याच्या नेतृत्वाखाली आत्माराम ज्येष्ठराम वेंद्रुक,गणेश तुकाराम वेंद्रुक,धोंडू कृष्णा वेंद्रुक,हरी धोंडू वेंद्रुक,रामचंद्र भिकाजी अनमने,लक्ष्मण विठ्ठल नरसाळे,व मिलिंद देवळेकर यांनी भाजपा चा झेंडा हातात घेतला आहे,
आमदार श्री नितेश राणें यांच्या विकासाच्या संकल्पनेवर वर प्रेरित होऊन प्रवेश घेतला आहे. आमदार नितेश राणे या भागाचा विकास करू शकतात असा विश्वासही प्रवेश करताना व्यक्त केला. यावेळी श्री बाळा खडपे,बंड्या नारकर,उत्तम बिर्जे,रवी पाळेकर,अजित राणे,संदीप नाईक धुरे व बापर्ड सरपंच श्री संजय लाड उपस्थित होते.

error: Content is protected !!