कै. पुष्पसेन सावंत यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

  माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांच्या जयंती निमित्त हुमरमळा अणाव येथील पुष्पसेन ज्ञानपिठात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहयोगातुन रक्तदान शिबीर पार पडले.
  या शिबीरात पुष्पसेन ज्ञानपिठाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्थपणे रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉक्टर व अन्य कर्मचा-यांचे उत्तम सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, माई नर्सिंग स्कुल, अॅग्रीकल्चर कॉलेज, श्री.पुष्पसेन सावंत ज्युनिअर कॉलेज मधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शिबीर यशस्वी करण्यात मोलाची भुमिका पार पाडली.
error: Content is protected !!