माजी तंटामुक्ती अध्यक्ष- शिवसेना शहरप्रमुख सुहास राऊत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कुटुंबापासून दुरावलेल्या उत्तराखंड येथील व्यक्तीला दिले त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात

मूळ उत्तरा खंड येथील रहिवाशी गेली काही 10 दिवस वरचा स्टँड हायवे येथील बस स्टॉप वर बसून मदतीची वाट बघत असायचा.
वय 36 वर्ष असणारा हा माणूस मूळ गाव माढो तांडा जिल्हा पिलिभित उत्तराखंड येथील असून तो कामानिमित्त राहायला असणाऱ्या केरळ कोची येथून आल्याचे समजते मिळेल त्या गाडीने प्रवास करत पायी चालत येऊन तो इथे खारेपाटण येथे पोचला व गेले सुमारे 8 /10 दिवस खारेपाटण वरचा स्टँड येथे येवून राहिलां.
बस स्टॉप शेजारी सुहास राऊत यांचा वडापाव चा व्यवसाय असल्याने रात्री जाताना नेहमी तो खाण्यासाठी मागायचा त्यानी 8/10 दिवस त्यांना पोटभर अन्न दिले. मग त्याची चौकशी केली असता तो कुटुंबा पासून दुरवल्याचे कळले. मग राऊत यांनी त्याच्या कडून घरचा मोबाईल नंबर घेवून .त्यांचे कुटुंबातील भाऊ यांच्याशी संपर्क केला.कुटुंबीयांनी अखेर त्यांचे कुटुंबातील दोन भाऊ यांनी खारेपाटण येथे येत आपल्या भावाला ताब्यात घेतले. सुहास राऊत यांच्या सामाजिक बांधिलकी च्या तत्परतेमुळे एका कुटुंबापासून दुरवलेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाशी भेटता आलं. सुहास राऊत यांच्या या सामजिक कार्य बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!