खारेपाटण येथे आयुष्मान आरोग्य मंदिराचे उदघाटन संपन्न
सरपंच प्राची इस्वलकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ
खारेपाटण येथे नुकतेच आयुष्मान आरोग्य मंदीराचे उदघाट्न करण्यात आले आहे. खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या शुभहस्ते या आरोग्य मंदिराचा शुभारंभ करण्यात आला. या आयुष्मान आरोग्य मंदिराच्या निर्मिती मुळे येथील नागरिकांना अजून एक आरोग्य संजीवनी निर्माण झाल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या आयुष्मान आरोग्य मंदिराचा येथील नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून मुंबई गोवा महामार्गांवर असणारे एक महत्वाचे शहर आहे.खारेपाटण येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून हे सर्वच नागरिकांना फार उपयुक्त आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांच्या आरोग्याची संजीवनी आहे.त्याचबरोबर आता खारेपाटण येथे आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापन केल्याने नागरिकांना अजून एक आरोग्य संजीवनी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या उदघाटन प्रसंगी सरपंच -प्राची इस्वलकर,उपसरपंच -महेंद्र गुरव, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.निलोफर मॅडम, गेडाम सर,आरोग्य सेविका -लक्ष्मी करोड, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सी. एच. ओ -जाधव मॅडम , आशा सेविका, आदि उपस्थित होते.