कणकवलीतील मसुरकर किनई रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवा
शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांची कणकवली पोलिसांकडे मागणी
कणकवली शहरामधील एस एम हायस्कूलच्या मागील मसुरकर किनई रोड वरती दोन्ही बाजूने वाहने पार्किंग केलेली असतात. त्यातच सदरील मार्गावरून अवजड (चिरे) वाहतूक सुरु असते. यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांना याचा त्रास होत आहे. काही वेळेस मोठ्या गाड्यामुळे चालता सुद्धा येत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
तरी सदरील मार्गावरील अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनावारती कारवाई करून लवकरात लवकर वाहने हटवावीत अशी मागणी कणकवली शिवसेना शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी कणकवली पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बाबू आचरेकर उपस्थित होते.