तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडून महिलेचा मृत्यू

मालवण काळसे बागवाडी येथील घटना

मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान श्रीमती अनिता अंकुश कुडाळकर (वय – ६५) या शेतीकामासाठी शेतात जात असताना घरापासून ५० मीटर अंतरावर मळ्यात जाण्याच्या पायवाटेवर तुटून पडलेल्या विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारेवर त्यांचा पाय पडून विजेचा शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अनिता कुडाळकर यांना घरी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मुलगा भूषण हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता ही दुर्घटना त्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर वाडीतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, अनुष्का हेरेकर, नाना खोत, बाळू खोत, भाऊ नार्वेकर, श्रीकांत जावकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि महावितरणचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन आबा परब, कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी

प्रकाश मोरे, सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात बागबाडी ग्रामस्थ यावेळी आक्रमक झाले आणि जोपर्यंत महावितरण अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह जाग्यावरुन हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. वीज तारा एकत्रित जोडणारे स्पेसर नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यामुळे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्राण गेला आहे असा आरोप

उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला. कारण बागवाडीतील कमकुवत विज तारांबद्दल तसेच खाली आलेल्या तारांबद्दल चार महिने अगोदर पासून त्या बदलण्यासाठी ग्रामस्थ मागणी करत होते. तसेच २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ अभियंता अर्जुन भिसे यांना प्रत्यक्ष भेटून महावितरणच्या विद्युत लाईनच्या दुरुस्तीसाठी मागणी बागवाडी ग्रामस्थ यांनी केली होती असे श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगि त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल यामुळे ग्रामस्थ आज अधिक आक्रमक झाले.

error: Content is protected !!