डॉ . आंबेडकर सामाजिक विकास योजने चा निधी वाड्या वस्त्यांवर पोहचलाच नाही

सामाजिक एकता मंच च्या पदाधिकारी यांनी समाजकल्याण आयुक्त यांना विचारला जाब
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन 2023 / 24 या वर्षासाठीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर कामातील कणकवली ,देवगड , वैभववाडी तालुक्यात बेंचेस (बाकडी ) अनुसूचित जाती/ जमातीच्या गावातील वाड्या वस्त्यांवर मंजूर यादीप्रमाणे बसवल्या गेल्या नसल्याबाबत समाज कल्याण आयुक्त सिंधुदुर्ग यांची सामाजिक एकता मंच सिंधुदुर्ग च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली . सामाजिक एकता मंच सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व अनुसुचित जाती / जमातीं च्या समाज संघटनांची एकत्रित संघटना आहे . सदर चर्चेवेळी संबंधित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या 11 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे सदर योजनेत कारवाई केलेली दिसून येत नाही .अनेक वाड्या वस्त्यांमधील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सदर बेंचेस किती मंजूर झाले आहेत? त्या कुणी दिल्या आहेत ? याबाबत काहीच माहिती नाही सदर बेंचेस अनुसूचित जाती जमातीच्या ग्रामपंचायत च्या सदस्यांना अगर कोणाही अनुसुचित जातीच्या व्यक्तींना न विचारता इतरत्र बसवण्यात आलेले आहेत. अशा तक्रारी सामाजिक एकता मंचकडे प्राप्त झाल्या आहेत .त्यामुळे सदर योजनेचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही ही बाब समाजकारण आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या लक्षात आणून दिली .तसेच सदर योजनेचे नाव बेंचेस (बाकड्यांवर )लावलेले नाही . तरी तात्काळ सदर बेंचेसवर बाकड्यांवर डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचे नाव घालावे अशी मागणी करण्यात आली . या सर्व बाबतीस समाज कल्याण आयुक्त सिंधुदुर्ग जबाबदार आहेत असे त्यांना कार्यकत्यांनी आक्रमक होवुन सांगितले . यावेळी
समाज कल्याण आयुक्त यांनी योजनेतील गंभीर चुका लक्षात आल्या आहेत असे कबुल करून थोडावेळ द्या मी चौदा दिवसात संपूर्ण कारवाई करून आपणास लेखी अहवाल देतो असे सांगितले .
तसेच सदर योजनेतून एका बेंचेस ला साडेबारा हजार रुपये खर्च केल्याचे दिसुन येत आहे . तीन तालुक्यात एकुण 2000 बेंचेस चे वाटप करण्यात आले आहे . त्यासाठी अडीज कोटी रुपये चा निधी सदर योजनेतून खर्च केलेला आहेत . या योजनेत फार मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक स्तरावर आढळून येत आहे ही बाब गंभीर असल्याचे सांगण्यात आले .
या सर्व बाबतीत येत्या चौदा दिवसात सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गला समाधान कारक अहवाल न दिल्यास प्रखर आंदोलन करण्यात येईल असे समाज कल्याण आयुक्त सिंधुदुर्ग यांना यावेळी सांगण्यात आले .
यावेळी बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक एकता मंचचे सचिव समाजभूषण संदीप कदम , रोहीदास समाजाचे राज्याध्यक्ष संजय कदम , युवा नेते प्रकाश वाघेरकर , तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण , बौद्धमहासभा महासचिव संजय पेंडुरकर ,मंगेश चव्हाण , राजन तांबे ,प्रभाकर चव्हाण ,अमित चव्हाण , हेमंतकुमार तांबे , रोहीदास समाज माजी जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण ,अनिस कुमार चव्हाण , बौद्धमहासभा जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम , भारतीय चर्मकार समाज मुंबई जिल्हाध्यक्ष सी आर चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी व इतर उपस्थित होते .
कणकवली प्रतिनिधी