नवविवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून पती व सासू निर्दोष
आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
वैभववाडी तालुक्यातील कुसुर (मधलीवाडी) येथील नवविवाहीता भक्ती भरत पाटील (24)हिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच चरित्र्याबाचतचा सतत संशय घेऊन जाच केला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तीला पेटवून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती भरत वसंत पाटील व सासू वनिता वसंत पाटील यांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी.गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१० एप्रिल २०१९ रोजी पहाटे नवविवाहीता भक्ती पाटील हीने राहत्या घरी रॉकेल अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. त्यात ती १०० टक्के भाजली होती. त्यानंतर तीला जिल्हा रुग्णालयात व नंतर कोल्हापूर येथील सीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सीटी हॉस्पिटल येथील मृत्यूपूर्व जबाबात तीने नवरा व सासू यांनी वेळोवेळी चारित्र्यावरून संशय घेऊन शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच चार वर्षांचे वैवाहीक जिवन नकोसे करून सोडले होते, त्यामुळे आपण पेटवून घेतल्याचे सांगितले होते. दरम्यानच्या कालावधीत तीचा भाऊ सुरज तळेकर रा. कसुर पिंपळवाडी याने वैभववाडी पोलीसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती व सासू विरूद्ध भादंवि कलम ३०६, ४९८ अ ३४ नुसार गुन्हां दाखल करण्यात आला होता.
तपासात घटनेपूर्वी बऱ्याचवेळा नातेवाईक व गावातील प्रतिष्ठीतांनी मध्यस्थी करून समेट घडविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच नवऱ्याचा पहिला विवाहही झाला होता. तसेच पहिल्या पत्नीला अशाच प्रकारे त्रास दिल्याने घटस्फोटही झाला होता असे सुनावणीत पुढे आले. तसेच जिल्हा रुग्णालयात विवाहीतेचा मृत्यूपूर्व जबाबदेखील नोंदविला होता. त्यात तीने नवऱ्याने वाचविण्याचा प्रयत्नही केला होता, असे म्हटले होते. त्यामुळे सुनावणीत आत्महत्या कि अपघात याबाबत संशय निर्माण झाल्याने व कोणताही सबळ पुरावा न आल्याने दोन्ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली