मच्छिमाराना बजवलेल्या नोटीसीबाबत मार्ग निघेल – आम. निलेश राणे

कुडाळ प्रांत कार्यलयात झाली बैठक

मालवण मधील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांना सीआरझेड उल्लंघन नोटीस बजवण्यात आली होती. त्या संदर्भात आज कुडाळ येथील उप विभागीय कार्यालयात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर मच्छीमाराना बजावलेल्या नोटीसीबाबत सुनावणी झाली. यामध्ये सकारत्मक चर्चा होऊन कायद्याच्या चौकटीत राहून मच्छीमार आणि व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाणार नाही असे मच्छिमारांना आश्वासित करण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी देखील आम्ही मच्छीमारांच्या बाजूने असून यावर निश्चितच मार्ग निघेल असे नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
हरित लवादाकडे झालेल्या तक्रारीनुसार मालवण किनारपट्टीवरील सुमारे ४८ मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिकांना प्रशासनाने सीआरझेड कायद्याचा आधार घेत नोटीस बजावल्या आहेत. हि बांधकामे ४८ तासाच्या आत काढून टाकावीत अन्यथा प्रशासन आपल्या पद्धतीने ती काढून टाकेल असेही त्या नोटिशीत म्हटले आहे. याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी आज सकाळी उप विभागीय कार्यालय कुडाळ यांच्या कार्यालयात या मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिकांनी आपले म्हणणे मांडले. यावेळी आमदार निलेश राणे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर प्रसार माध्यमांना माहिती देतांना आमदार निलेश राणे म्हणाले, मच्छिमार बांधवांच्या उदर्निर्वाहावर काही नोटिसा प्रशासनाने बजावल्या होत्या. हरित लवादाकडे कोण बांधकामाबाबत तक्रार केली होती. त्याला अनुसरून प्रशासनाने त्या नोटीस बजावल्या होत्या. मच्छिमार बांधवांची बाजू घेण्यासाठी आपण इकडे आलो. संबंधित मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिक यांनी आपल्या उदर्निर्वाहाबाबत पक्के बांधकाम केलेले नाही. यावर मार्ग निघू शकतो. तो मार्ग कसा काढता येईल यासाठी हि बैठक होती. प्रांत मॅडम आणि सर्व आधिकरी याबाबत अतिशय सकारात्मक होते. याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांचासुद्धा बोलून घेतले आहे. ते सुद्धा या विषयाबाबत पॉझिटिव्ह अहित. यातून चांगला मार्ग निघू शकतो. कायम स्वरूपी यावर काही तोडगा निघाला पाहिजे यासाठी शासन, प्रशासन, मंत्री, लोकप्रतिनिधी, मच्छिमार बांधव हे सगळे मिळून याबाबत सकारत्मक आहेत. हि बैठक सुद्धा चांगल्या वातावरणात पार पडली. मच्छिमार बांधवानी आपले मुद्दे समोर ठेवले. प्रशासनाकडूनही त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. दोघांनाही एकमेकांचे विषय कळलेले आहेत. लवकरात लवकर मार्ग निघेल असा विश्वास आमदार निलेश राणे यान व्यक केला.
मच्छिमार नेते आणि मालवणचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी, मालवण किनारपट्टीवर जे मच्छिमार आणि मत्स्यव्यावसायिक आहेत, त्यांना प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांबाबत नोटिसा काढलेल्या होत्या. ती बांधकामी हटविण्याबाबत त्यात उल्लेख होता, तसेच न हटविल्यास प्रशासन आपल्या पद्धतीने हटवेल असाही उल्लेख त्या नोटिशीमध्ये होता. याबाबत आम्ही आज विविध मच्छिमार संघटनांचे पदाधिकारी, संबंधित मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिक कुडाळ येथे प्रांत ऑफिसमध्ये आलो. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचे म्हणणे मांडले. यावेळी आमदार निलेश राणे सुद्धा ऊपस्थित होते. राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत जी केस प्रलंबित आहे, त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडण्याचे काम आम्ही सामुदायिकरीत्या करणार आहोत. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद देऊन या मच्छिमारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असे मच्छिमारांना आश्वासित केले आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानत असल्याचं मच्छिमार नेते आणि मालवण नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरस्कर यांनी सांगितले. यावेळी मच्छिमार संघटना प्रतिनिधी दिलीप घारे, मालवणच्या नगरसेविका अन्विशा आचरेकर यांनी देखील प्रशासनाचे आणि आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाचे सचिव दिलीइप घारे म्हणाले, मच्छिमार आणि मत्स्य व्यावसायिकांनी केलेली बांधकामे पक्क्या स्वरूपाची नाहीत. तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. पण प्रशासनाने त्यांना सीआरझेड कायद्याचा आधार घेऊन नोटिसी बजावल्या आहेत आणि ४८ तासात बांधकामे पाडण्याचे या नोटिशीत म्हटले आहे. त्याबाबत आज आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रशासनासमोर आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहेत. मच्छिमार बांधवांची अशी बांधकामे आम्ही सहसा पडणार नाही, असे प्रशासनाने आम्हाला आश्वासित केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून या बांधकामांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्याबाबत आम्ही पाठपुरावा करू असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याचे श्री. घारे यांनी सांगितले.
मालवणच्या दांडी विभागाच्या नगरसेविका अन्विशा आचरेकर यांनी देखील याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!