सीआयडी ब्रँच पोलिस हवालदार स्नेहा राणे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

पोलीस दलात उत्कृष्ट योगदान व कामकाज केल्याप्रकरणी गौरव

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान

उत्कृष्ट कामगिरी व गुन्ह्यांच्या उघडकीस मोलाचे तपास काम केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांच्यामार्फत देण्यात येणारे सन्मानचिन्ह सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या महिला पोलीस हवालदार स्नेहा प्रकाश राणे यांना 15 ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सोहळ्यात 15 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्यासह अन्य उपस्थित होते. स्नेहा राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्कृष्ट काम केले असून सध्या ते सीआयडी ब्रांचला पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहेत. स्नेहा राणे या सिंधुदुर्गनगरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, आणि सध्या गुन्हे अन्वेषण विभाग पथक सिंधुदुर्ग या ठिकाणी कार्यरत होत्या. तसेच क्राईम कामकाज ,गुन्ह्यांचा तपास, महिलांविषयी सर्व तक्रारी अर्ज चौकशी, गुन्ह्यांचा तपास,सर्व प्रकारचे बंदोबस्त या वेळी त्यांनी महत्वपूर्ण काम केले. या कालावधीत कणकवली येथे अधिकारी यांच्या जवळ रायटरशिप कामकाज केले. 2022 – 23 असे दोन वर्ष कलमठ बीट अंमलदार म्हणून उत्तम प्रकारे कामकाज केले होते. त्यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!