आंबोली मान्सून मॅरेथॉन अविस्मरणीय करण्यासाठी टीम ॲडव्हेंचर सज्ज!
हर घर तिरंगा या संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न घेऊन आंबोली धावणार!
कोकणचे व्हिजनरी नेतृत्व, आपले लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाणसाहेब आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम भव्यदिव्य अशी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजीत करत आहेत..
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय विशालजी परबसाहेब यांच्या शुभहस्ते या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनचा शुभारंभ शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता आंबोली येथे होत आहे.
दोन टप्प्यात होत असलेल्या या मॅरेथॉनचा पहिला टप्पा २१ किलोमीटरचा असून सकाळी सव्वा सहा वाजता त्याची सुरुवात होईल, तर सहा किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय विशालजी परब हिरवा झेंडा दाखवून करतील. सह्याद्रीचा मानबिंदू असलेल्या निसर्गसुंदर आंबोलीमधील या भव्य मान्सून मॅरेथॉनमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि या मान्सून मॅरेथॉनचा स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटावा अशी विनंती सरपंच आंबोली ग्रामपंचायत तसेच सह्याद्री एडवेंचर अँड रेस्क्यू टीम यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या निमित्ताने आज आंबोली ग्रामपंचायत येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी सरपंच सावित्री पालयेकर,संतोष पालयेकर,सह्याद्री ॲडव्हेंचर ॲंन्ड रेस्क्यू चे मायकल डिसोजा,राकेश आंबरूसकर,नारायण चव्हाण,प्रथमेश गावडे,राजू राऊळ,संतोष पालयेकर,अजित नार्वेकर आदी उपस्थित होते.
आंबोली, प्रतिनिधी