सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे स्वातंत्र्य दिनी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण.

कणकवली/प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या सीईटी नीट आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे तसेच सुनावण्या होऊन देखील जात वैधता न मिळाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत उमेदवारांना गेले दीड वर्ष जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांचे सदस्य पद रद्द होणार आहे त्याचप्रमाणे सेवेतील निवड होऊन जातपडताळणी नसल्याने हजर न झालेल्या त्याप्रमाणे सेवेत असलेल्या मात्र जात वैधता न झालेल्या उमेदवारांचे नोकरीतील होणारे नुकसान या सर्व मागण्यांसाठी जात पडताळणी समिती ठाणे यांनी 9 ऑक्टोंबर 2023 च्या आदिवासी विकास विभागाच्या परिपत्रकानुसार कोणते कार्यवाही न केल्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होणार आहे त्याच्या निषेधार्थ आणि प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्यापासून आमरण उपोषण पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने आयोजित केलेले आहे असे माहिती अध्यक्ष श्री.अमित ठाकूर व सचिव श्री.समीर ठाकूर यांनी दिलेली असून उद्याच्या आंदोलनाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहनही केलेले आहे.

error: Content is protected !!