वन्यप्राण्यांच्या त्रासाबाबत वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष

आचरा-अर्जुन बापर्डेकर वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे या निवेदनात त्यांनी कोकणामध्ये वन्य प्राण्यांपासून फार मोठे शेतीचे नुकसान होत आहे. प्रामुख्याने यामध्ये माकड, लाल तोंडाची माकडे, हत्ती गवेरेडे यांच्यापासून शेती बागायती पिकांचे नुकसान होत आहे त्यांच्या बंदोबस्तासाठी उपाय योजना सुचवण्यासाठी कमिटी नेमण्यात आली होती पण पुढे काय कार्यवाही झाली याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत यावर तातडीने उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे सध्या शेतकरी वन्य प्राण्यांपासून त्रस्त झालेले आहेत त्यासाठी आमच्या माहितीप्रमाणे माकडांची धरपकड करून जंगल भागात सोडणे किंवा नसबंदी करणे शक्य नसेल तर वन्य प्राण्यांना मारण्याची शेतकऱ्यांना परवानगी देणे आदी उपाय योजना होऊ शकतात. दरवर्षी आपण किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत राहणार यासाठी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे असे त्यांनी नियोजनात स्पष्ट केले आहे

error: Content is protected !!