कुडाळमध्ये चर्चा ‘त्या’ बॅनरची!

जिल्हा संघटक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांचे फोटो

कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज चौकात लावलेल्या एका बॅनरची सध्या कुडाळच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना तालुका कार्यालयासमोर कुडाळ मध्ये शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा बॅनर लागला आहे. आमदार रवीन्द्र फाटक यांचा वाढदिवस 15 ऑगस्टला आहे. शिवसेनेच्या या बॅनर वर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, भैया सामंत, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी बबन शिंदे, अरविंद करलंकर, सौ. सावंत, संदेश पटेल आदींचे फोटो आहेत. तसेच रवींद्र फाटक याना वाढदिवसाठी शुभेच्छूक म्हणून तालुका प्रमुख बंटी तुळसकर, महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट आणि शिवसैनिक सिद्धेश शिरसाट यांची नावे आहेत. पण त्या मांदियाळीत जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणि महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांची नावे मात्र कुठेच दिसत नाहीत. आणि याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान याबाबत योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्याशी पत्रकरांनी संपर्क साधला असता त्यांनी तो बॅनर वैयक्तिक शुभेच्छांचा असल्याचं सांगितलं. पण कसही असलं तरी सद्याच्या राजकीय परिस्थितीत रवीन्द्र फाटक याना शुभेच्छा देणारा तो बॅनर आणि त्यावर जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणि जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांचे फोटो सोडून इतर सर्वांचे फोटो असणं या गोष्टीची मात्र जोरदार चर्चा कुडाळमध्ये रंगली आहे.

error: Content is protected !!