कणकवली एस. एम. ज्युनिअर कॉलेज चे माजी प्राध्यापक सुरेश शुक्ल यांचे निधन
कणकवलीतील एस एम ज्युनियर कॉलेज चे माजी प्राध्यापक सुरेश रामलाल शुक्ल यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी इंग्रजी विषय च्या ख्यातनाम व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा नावलौकिक मिळवला होता. कणकवलीत केलेल्या सेवेनंतर S.M.लोहिया ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले.
संगीत, नाट्य, सांस्कृतिक कार्याची त्यांना आवड होती. काशीनाथ घाणेकर यांना कणकवली येथे कॉलेज मध्ये असताना एक वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आणले होते.
कोल्हापुरात आल्यावर नोकरी सांभाळून स्वरनिनाद नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. जागो हिंदुस्तानी, शब्दसुरांच्या झुल्यावर, देश मेरा रंगला या सारखे दर्जेदार कार्यक्रम देश विदेशात संपन्न केले. तसेच अमेरिकेत दोन वेळा संपन्न केले.
पर्यटनाची देखील त्यांना खूप आवड होती. अत्यत मेहनत घेत त्यांनी M.A. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी