युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेतील २ री व ३ री मधील गुणवंत विद्यार्थी गोवा सायन्स सेंटरच्या भेटीला

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील २ री व ३ री इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी गोवा सायन्स सेंटर येथे भेटीसाठी घेऊन जाण्यात आले. या सहली दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना पणजी येथील लायब्ररी आणि केसरी ॲक्वेरीयम ला भेटीचा आनंद मुलांना देण्यात आला .
.युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते शालेय अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण जागृत व्हावा या उद्देश्याने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर सोबतच आशिया खंडातील सर्वात मोठी लाइब्रेरी, केसरी ऍक्वेरीयम अशा पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आला.
- गोवा सेंटर साठी सहभागी विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता 2 री
1.स्वराध्या निलेश पेडणेकर, मठ नंबर एक , वेंगुर्ला
2.शांभवीउत्तम मोहिते, पडेल गावकरवाडी, देवगड
3.सन्मतीश अमर पाटील, म्हापण खालचा वाडा
4 .रिषभ नागेश जाधव, कसाल कुंभारवाडी
5.नम्रता नंदकुमार सोनटक्के, आचरे पिरावाडी, मालवण
इयत्ता 3 री
1.उत्कर्ष उत्तम तानवडे, शासकीय वसाहत कोनाळकट्टा
2.आराध्या अमोल आपटे, सुधाताई वामनराव कामत विद्यालय
3.पियुष विजय लाड,नेरुळ शिरसोस
4.रेयांश संदीप कोळसुलकर, वेंगुर्ला नंबर ३
5.रुद्रा राहुल कानडे,, कुडाळ पडतेवाडी
या आधी 18 जून ते 21 जून 2024 या कालावधीत 4 थी, 6 वी व 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात आले होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण