भाजप नेते निलेश राणे यांच्या कडून चिंदर बाजार येथील बांदिवडेकर कुटुंबियांना मदतीचा हात

आचरा- घराची भिंत कोसळून चिंदर बाजार येथील सुषमा सुरेंद्र बांदिवडेकर यांचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या माध्यमातून रोख स्वरूपात 10, 000 हजाराची आर्थिक मदत पाठून दिली.
भाजप कार्यकर्ते नितीन पावसकर आणि राजु वराडकर यांच्या हस्ते आज सुषमा बांदिवडेकर यांना हि रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, बूथ अध्यक्ष संतोष अपराज, मंदार बांदिवडेकर, सुप्रिया बांदिवडेकर आदी उपस्थिती होते.