आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुवा रविकांत राणे यांच्याकडून गुरुपौर्णिमा साजरी

दशावतार, भजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कलाकारांचा केला गौरव

गुरु पौर्णिमेनिमित्त या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून केले जाते कौतुक

कोकण कला भूषण कै. चंद्रकांत कदम (गुरूदास) यांचे परमशिष्य जानवली येथील बुवा रविकांत राणे,यांच्या निवासस्थानी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. समाजात विविध कलांमध्ये कार्यरत असणाऱ्या भजनी बुवा, दशावतारी नाट्य कलावंत व अन्य कलाकारांचा सत्कार करत रवी राणे यांनी गुरुपूजन सोहळा साजरा करत अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली.
कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून संगीत अलंकार अजित गोसावी आणि ज्योतिर्विंद्या उदय दुधवडकर आणि प्रसिद्ध पखवाज वादक महेश परब उपस्थित होते.
त्यांच्यासोबत जानवली गावचे सरपंच अजित पवार, पोलीस पाटील मोहन सावंत, माजी सरपंच भगवान दळवी हे देखील उपस्थित होते.
छत्रपती शिवराय, गुरुवर्य. कै.चंद्रकांत कदम आणि सद्गुरू कै. परशुराम सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून या गुरुपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील भजन आणि दशावतार क्षेत्रात आपले योगदान दिलेल्या कलाकारांचं सत्कार रविकांत राणे यांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कार सोहळ्यस जेष्ठ पखवाज वादक मारुती मेस्त्री,बबन वाघ,बुवा, शशी सावंत बुवा, शशी राणे बुवा, विलास राणे बुवा सदानंद कसालकर बुवा, भास्कर गावडे असेच दशावतार कलाकार आप्पा दळवी, श्री सामंत बंधू, श्री बाळा सावंत आणि इतर भजन,दशावतार कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गुरु बंधू,शिष्य मंडळींचा संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाच सूत्रसंचालन बुवा गोपीनाथ लाड यांनी केले. या पूर्ण कार्यक्रमाच नियोजन आणा तवटे, वैभव नानचे,मयूर मेस्त्री,नंदन राणे,लकुल गोसावी,संजय राणे, सागर दळवी,अनिकेत राणे, गौरांग राणे,अमेय साटम आणि लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ,जानवली गणपतीचीवाडी तील सर्व सदस्यांनी केले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने साजऱ्या केलेल्या या आगळ्यावेगळ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे सर्वांनी कौतुक केले.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!