कलमठ ग्रामपंचायतचे लिपिक दीपक गुरव यांचे निधन
माजी सरपंच देविका गुरव यांना पतीशोक
कणकवली तालुक्यातील कलमठ – गुरववाडी येथील रहिवासी व कलमठ ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक दीपक दिगंबर गुरव (वय 43) यांचे काल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. गेले अनेक वर्ष कलमठ ग्रामपंचायत च्या लिपिक पदी त्यांनी काम केले होते. कलमठच्या माजी सरपंच देविका गुरव यांचे ते पती होत. त्यांच्या पक्षात आई, पत्नी देविका, दोन मुले दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली