सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची खातरजमा करा

पूजा खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी

नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील प्रमाणपत्रे तपासा

राज्यातील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून तपासणी सुरु असून चुकीच्या पद्धतीने त्यांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेतला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील सर्व दिव्यांग (अपंग) कर्मचारी आणि अधिकारी यांची दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच ते लाभ घेत असलेल्या शासनाकडील विविध तपासणी करण्यात यावी, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारिरीक तपासणी करुन त्यांना दिलेल्या अपंगत्वाच्या टक्केवारीची खातरजमा करुन घेण्याविषयी आपल्या जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. कारण त्यामुळे गैरमागनि अथवा वशिलेबाजी करुन किवा खोटी प्रमाणपत्रे सादर करून शासनाच्या दिव्यांग आयकर प्राप्तीकर व नोकरीतील विविध सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्यांवर वचक बसून शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
या विषयी काही अधिकारी व कर्मचारी यांची सेवेत लागल्यापासून खातेस्तरावर पुन्हा तपासणी झाली नसल्याचे समजते. तरी याचाचत आपल्याकडून उचित आदेश व कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती. तसेच नव्याने अपंग कोट्यातून नोकरीवर रुजू झालेले शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्याही प्रमाणपत्रांची व शारिरीक तपासणी करणे आवश्यक आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!