व्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे यांची निवड

सरचिटणीसपदी कणकवलीतील सुप्रिया पाटील
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड निमंत्रित सदस्य पदी
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी तळेरे येथील श्रावणी मदभावे तर कणकवली येथील सुप्रिया पाटील यांची सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड झाली.
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्य करणार आहे. या समितीत जिल्हा संघटक म्हणून अर्पिता मुंबरकर यांचे काम कायम सुरू राहणार असून जिल्ह्यात व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करणे, नशेपासून परावृत्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या समितीत उपाध्यक्ष म्हणून सुनिल कांबळी (वैभववाडी), दिप्ती पडते (कुडाळ), खजिनदार रूपेश पाटील (सावंतवाडी), सहसचिव संग्राम कासले (मालवण), सहसचिव डॉ. संजिव लिंगवत (वेंगुर्ला), जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर (वेंगुर्ला), जिल्हा सल्लागार महेश सरनाईक (कणकवली), जिल्हा प्रवक्ता मेघा गांगण (कणकवली) तर निमंत्रित सदस्य म्हणून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची निवड जाहीर करण्यात आली.
या जिल्हा कार्यकारिणीत प्रत्येक तालुक्याचे एक असे आठ सदस्य असणार आहेत. लवकरच त्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. कणकवली येथे झालेल्या बैठकीला रिमा भोसले, श्रद्धा कदम, पूजा दळवी, अतुल दळवी, अनिल चव्हाण, जयराम वायंगणकर, नामदेव मठकर, शिवराम आरोलकर, नीकेत पावसकर, अमोल गोसावी, सतीश मदभावे आदी उपस्थित होते.
नशाबंदी मंडळ गेली ६५ वर्षे व्यसनमुक्तीबाबतचे महान कार्य करीत आहे. आता जिल्हा व्यसनमुक्ती समितीच्या माध्यमातून आपण वाढलेल्या व्यसनांना आळा घालण्यासाठी जे जे उपक्रम राबवाल त्यांना आपला कायम पाठिंबा असेल. असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केले.
या समितीच्यावतीने नार्कोटक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पर्वरी गोवा यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन देणार येणार आहे. अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा कामाला लावण्यासाठीचा कृती आराखडा बनविण्यात येणार असून पोलिस अधीक्षक गोवा आणि सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन कृती आराखड्यावर चर्चा करणार आहे.
कणकवली, प्रतिनिधी