पत्रकार संजय सावंत यांना पितृशोक

द्वारकानाथ सावंत यांचे निधन
फोंडाघाट – विद्यानगर येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सुभाष द्वारकानाथ सावंत ( ७८ वर्षे ) यांचे, पुणे येथे मंगळवार तारीख १६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांनी एसटीमध्ये चालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर, काही काळ महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन, फोंडा या सिलिकामाईन्स मध्ये सेवा केली. मिश्किल आणि स्पष्ट वक्ते स्वभावामुळे ते फोंडाघाट मित्रपरिवार मध्ये लाडके होते.
फोंडाघाट मधील पत्रकार आणि फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत आणि संतोष सावंत यांचे ते पिताश्री होत.त्यांच्या अंत्ययात्रेत सायंकाळी उशिरा सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आणि मित्र परिवाराने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कणकवली प्रतिनिधी