“विठू नामाच्या जयघोषात आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी “

कणकवली/मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडिययल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत आषाढी एकादशी आणि मोहरम चा सोहळा उत्साहात पार पडला.
वारकरी दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली ,विठ्ठल रखुमाई सोबतच विविध संत आणि वारकरी वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आषाढी एकादशीचे महती सांगणारे भाषण प्रशालेचा विद्यार्थी कु. देवराज गुरव (७ वी अ) याने सादर केले ,तर मोहरमचे महत्त्व कू. शिफा बुलंद पटेल ( इयत्ता ७ वी अ) या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सांगितले. प्रशाला विद्यार्थिनी निधी कदम हिने उत्कृष्ट विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणारे गीत सादर केले.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष
श्री.मोहन सावंत सर यांनी आपल्या मनोगतातून आषाढी एकादशी व मोहरम च्या शुभेच्छा दिल्या. विठू नामाच्या जयघोषाने कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे ,
उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल संस्थापक सचिव प्राध्यापक हरीभाऊ भिसे सर ,सल्लागार डी.पी तानावडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वैष्णवी मोरवेकर मॅडम उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे सूत्रसंचाल प्रशाला शिक्षक हेमंत पाटकर यांनी केले.

error: Content is protected !!