विद्यामंदिर प्राथमिक विभाग व इंग्लिश मिडीयम मधिल चिमुकले रंगले वारीच्या दिंडीत

आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आली होती दिंडी

विद्यामंदिर प्राथमिक सेमी विभाग व विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मधिक बालवाडी व पहीलीचे विद्यार्थी रंगले पंढीरीच्या वारीमध्ये. आषाढी एकादशीचे निमित्त साधून बालकांच्या मनावर एकात्मतेचे व समतेचे संस्कार करणारे संत विचार नव्या पिढीला समजावे म्हणून प्रशालेतील बालविभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी वारकरी परंपरेचा पोशाख विद्यार्थ्यांना परिधान करून टाळ व मृदंग ‘ पताका ‘ ध्वज यांच्या साथीने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन परमेश्वराच्या पालकीच्या साथीने वारकरी परंपरेची दंडी शाळेच्या क्रीडांगणातून ते शिवारा देवायलया पर्यंत पायी चालत अभंगाच्या मृदू आवाजात आनंदाने विठूरायाच्या दर्शनाची पंढरपूर वारीचे प्रतिक हुबेहुब तयार करून आनंद सोहळा साजरा केला . या सोहळ्यात सर्व शिक्षक / शिक्षिका पालक तसेच मुख्याध्यापिका सौ करंबेळकर व सौ राणे तसेच मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव, जेष्ठ शिक्षिक अच्यूतराव वणवे सहभागी झाले होते . या वारकरी दिंडीला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तवटे, चेअरमन डॉ सौ राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!