कळसुलीतील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात रविवार 21 जुलै रोजी साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी स्थापन झालेल्या या मठात दरदिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुपौर्णिमेला भाविक भक्तांची मांदियाळीच अवतरणार आहे.
निसर्गरम्य परिसरात या मठाची उभारणी करण्यात आली आहे. दरदिवशी सकाळी काकड आरती, नित्यपूजन, स्वामी नामस्मरण व मठामध्ये भाविकांना अभिषेक करता येतो. दर गुरुवारी हजारोंच्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात त्याबरोबर हरिपाठ, पारायण, भजन, कीर्तन याचाही लाभ भाविकांना मिळतो. या मठात भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भक्तनिवासाचीही सोय करण्यात आली आहे.
रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे स्वामींची नित्य पूजा, सकाळी 8.30 वा. अभिषेक, सकाळी 10 वा. श्री सत्यदत्त पूजा, दु. 12.45 वा. नामस्मरण, दु. 1 वा. महाआरती, दु. 1.15 वा. महाप्रसाद, दु. अडीज वाजता श्री स्वामी समर्थ सप्तशती पुस्तकाचे भाविकांना वाटप, दु. 3 वा. ग्रंथवाचन, सायं. 7 वा. कीर्तन व हरिपाठ, रात्री 9 वा. स्थानिक भजने असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत व श्री स्वामी समर्थ मठ, कळसुली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी