संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 100 रक्तदात्यांचे रक्तदान
कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिर
माजी खासदार विनायक राऊतांकडून संदेश पारकर यांच्या उपक्रमांचे कौतुक
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कै. सुबोध टिकले स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेनेचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उत्स्फूर्तपणे अनेकांनी या शिबिरात सहभाग घेतला. माजी खासदार विनायक राऊत यांनी संदेश पारकर यांच्या या सामाजीक उपक्रमांचे कौतुक करत रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवदान मिळते. असे स्तुत्य उपक्रम राबवून संदेश पारकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवउद्गार माजी खासदार विनायक राऊत यांनी काढले. कणकवलीत भगवती मंगल कार्यालय येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उद्योजक सुयोग टिकले, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, शहर प्रमुख रुपेश नार्वेकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, वैभव मालंडकर, आदित्य सापळे, तेजस राणे, तात्या निकम, संजय पारकर, सौरभ पारकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली