पांग्रड ग्रामस्थांचा मोडलेल्या साकवावरून जीवघेणा प्रवास

माडाचे ओंडके टाकून प्रवास करण्याची आलीय वेळ

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावामध्ये पिटढवळ नदीवरील निवहा कडील साकवाची पार दुरावस्था झाली असून या साकवावरून ये – जा करताना ग्रामस्थांना जीव मुठीत घ्यावा लागत आहे. साकवाच्या पलीकडे लोकांची वस्ती तसेच शेती आहे … सध्या दिवसही पावसाचे आहेत अशा परिस्थितीत ग्रामस्थांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्याय म्हणून माडाचे ओंडके टाकून तारेवरची कसरत करावी लागत आहे .. जवळपास 2 वर्षांपासून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असफल ठरत असल्यामुळे ग्रामस्थानकडून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे …

या लोखंडी साकवाची पार दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून देखील संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केला जात आहे. या साकवावरून ये – जा करताना ग्रामस्थांना जीव मुठीत घ्यावा लागत असून एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!