कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी

कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला. कणकवली मराठा मंडळ जवळील केटी बंधारा, खारेपाटण माफी भागात भेटी देत श्री कातकर व देशपांडे यांनी आढावा घेतला. रात्री उशिरा पर्यत पुरस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून होते. यावेळी त्यांच्या सोबत निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तलाठी, मंडळ अधिकारी, अरुण जोगळे आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!