सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

सावंतवाडी: राजकारणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आज सावंतवाडीत आला.एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दिपक केसरकर आणी राजन तेली यांच्यातील तू तू मै मै पहायला मिळाली.हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी कार्यक्रम निमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,भाजपचे माजी आमदार आणी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे तिघेही आज सावंतवाडीत या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते.
दिपक केसरकर यांना कार्यक्रमास येण्यास थोडा उशिर झाला.याचेच औचित्य साधून दिपक केसरकर यांच्यावर आणी त्यांच्या शिक्षण खात्यावर राजन तेली चांगलेच बरसले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संच मान्यतेसह येथील गुणवत्तेवर बोलताना कोकणातील विद्यार्थी गरीब आहेत पण कष्ट करून शिक्षण घेवून दर्जेदार शिक्षण घेतात आणी गुणवत्तेत महाराष्ट्रात नंबर वन आहेत.पण शालेय शिक्षण मंत्री यांनी अधिक लक्ष्य देवून दर्जेदार शिक्षण व सोईसुविधा मिळण्यासाठी लक्ष्य घातले पाहिजेत अशी कोपरखळी मारली.
तर थोड्या वेळात दाखल झाल्यावर दिपक केसरकर यांनी संचमान्यतेचे समर्थन करत राजन तेली यांना जोरदार फटकारले.आपण अत्याधुनिक शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून सातत्याने झटत असल्याचे सांगितले.तर जर्मन देशात येथील मुलांना वर्षाला तीस लाखाचे पॅकेज मिळू शकते.यासाठी आपण जर्मन सरकारशी करार केला.असे सांगत राजन तेलीवर जोरदार हल्लाबोल केला.
सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा लढण्यासाठी दिपक केसरकर तयारीत आहेत.तर राजन तेली हे दिपक केसरकर यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत.तर याच विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी विशाल परब इच्छुक असून त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.आज हे तिघेही इच्छुक एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.यात तेली आणी केसरकर या दोघांतील शाब्दिक लढाई ही विशाल परब आपल्या डोळ्याने पहात होते.
दीपक केसरकर यांचे भाषण चालू असतानायाजन तेली हे मध्येच उठून निघून गेले.तर दिपक केसरकर यांनी आपले भाषण संपवल्यावर विशाल परबांशी हस्तांदोलन केले.यावेळेस दिपक केसरकर आणी विशाल परब यांच्यातील स्मितहास्य बरेच काही सांगून गेले.
ह्या कार्यक्रमात मात्र राजकीय नेत्यातील तू तू मै मै आणी राजकीय जुगलबंदी पहायला मिळाली…..

error: Content is protected !!