आमदार वैभव नाईक यांचे एसटी कर्मचार्‍यांनी मानले आभार

कुडाळ एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवून कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीर राहणाऱ्या ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे कुडाळ एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आभार मानण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी अशाच पध्दतीने आमच्या कायम पाठिशी रहा, अशी भावनिक साद यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून श्री. नाईक यांना घालण्यात आली. यावेळी एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख वैभव मालणकर, विभागीय सचिव आबा धुरी, एल. एम. सरोदे, शिवाजी कतुरे, इम्राण खान, सतीश कदम, विजय वाणी, हनुमान सुरे, एस.जी. ईरले, एस. एल. लाड, निलेश पाटील, निलेश इंगोले, संदीप पाटील, सुनील जंगम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!