सिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय

भाडेकरूंनी अनधिकृत कनेक्शन न वापरता खरेदी विक्री संघाकडे कनेक्शनची मागणी करावी

कुडाळ, शासन आणि एचपीसीएल या गॅस कंपनीच्या नव्या धोरणानुसार सिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया ग्राहकांनी पुर्ण करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नंदकिशोर करवडे यांनी केले आहे. दरम्यान तालुक्यात राहणाऱ्या भाडेकरूंनी अनधिकृत कनेक्शन न वापरता खरेदी विक्री संघाकडे कनेक्शनची मागणी करावी त्यांना तात्काळ सिलींडर देण्याची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रसिध्दीपत्रक देण्यात आले आहे.
त्यात असे असे म्हटले आहे की, शासन व एचपीसीएल कंपनीच्या नियमाप्रमाणे सहकारी संस्था व शासन मान्य सीएससी केंद्रामध्ये गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. कुडाळ खरेदी विक्री संघाचे एकुण जवळपास ३० हजार गॅस ग्राहक आहेत. या ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी कुडाळ खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. मात्र कंपनीच्या आदेशानुसार व्यवस्थापनाला काम करणे गरजेच आहे. कुडाळ खरेदी विक्री संघाकडून बुकिंग करण्यासाठी, पेमेंट जीपे करण्यासाठी व संपर्कासाठी कुडाळ संघाकडून मोबाईल नंबर जारी केले आहेत. तसेच गॅस कार्डची ई- केवायसी केली नसेल तर ती सुध्दा करून घेण्याच्या सुचना खरेदी विक्री संघाने दिल्या आहेत. गॅस ग्राहकांनी ई- केवायसी न केल्यास गॅसची सबसिडी, गॅस कनेक्शन बंद होणे किंवा ते कनेक्शन रद्द होवू शकते. तरी गॅस कनेक्शन धारकांनी वेळीच तारीख उलटून जाण्याच्या अगोदर ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांचे एकच गॅस कनेक्शन आहे, त्या ग्राहकांनी दुसरा सिलेंडर घेतल्यास गॅस संपल्यानंतर ग्राहकांची होणारी गैरसोय टळेल.
कुडाळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी काही नोकरवर्ग, कामगार, भाडोत्री राहत आहेत. अशा भाडोत्रींनी अनधिकृत कनेक्शने न वापरता कुडाळ खरेदी विक्री संघाकडे रितसर गॅस कनेक्शनची मागणी केल्यास त्यांना तात्काळ गॅस सिलेंडर देण्याची व्यवस्था केली जाईल. यासाठी आधारकार्ड व पत्याचा पुरावा अनिवार्य आहे अशी माहिती नंदकिशोर करावडे यांनी दिली. यावेळी कुडाळ खरेदी – विक्री संघाच्या गॅस विभागाचे व्यवस्थापक नागेश तवटे, सिनिअर क्लार्क श्री. जळवी आदिसह तालुक्यातील व्हीएलई उपस्थित होते.

error: Content is protected !!