विद्यामंदिर प्रशालेतील शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रशाले कडून कौतुकोद्गार
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता पाचवी कुमार अर्णव पाटील कुमारी आरोही मेस्त्री हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रविष्ठ झाले तसेच इयत्ता आठवी मधून कुमारी सानवी कारेकर कुमारी राशी राणे कुमारी वरदा मराठे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत प्रविष्ठ होवून शिष्यवृत्ती धारक झाले . या सर्व विद्यार्थ्याचा सत्कार योजना शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग श्री कुडाळकर साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ कमळकर, गटशिक्षणाधिकारी श्री किशोर गवस साहेब यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर व शिष्यवृत्ती मार्गदर्शक श्री शेळके जे जे उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी