विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सजली परसबाग

कणकवली : प्रतिनिधी
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एक एक्कर परिसरात विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यांने परसबाग लागवड करण्यात आली विद्यार्थांना कृषी श्रमाचे महत्व समजावे शेतीची आवड निर्माण व्हावी तसेच कष्टाची जाणीव तयार व्हावी या उद्देशाने प्रशालेत परसबाग उपक्रम राबविण्याची संकल्पना मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सर पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर आणि सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तमरित्या राबविली . प्रथम वांग्यांच्या रोपांची लागवड केली तसेच मिरची ‘ भेंडी ‘गवार ‘दोडका ‘ ‘ चिबूड ‘झेंडूची रोपे तुळस रोपे यांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली . प्रशालेत मध्यान भोजन योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते मध्यान भोजनात विविध भाज्यांचा देखिल समावेश करता येईल या उद्देशाने परसबाग उपक्रम प्रशालेने राबविला आहे यावेळी कोकण नाऊचे मयूर ठाकूर कृषिमित्र पंढरीनाथ जावध साहेब उपस्थित होते .