विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मुलींना मोफत एसटी पासचे वितरण

विद्यामंदिर प्रशाले कडून व्यक्त करण्यात आले समाधान
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे कणकवली डेपोचे व्यवस्थापक श्री परब व सहकारी यांच्या हस्ते प्रशालेतील मुलींना शासकीय मोफत एसटी पास योजना शंभर टक्के राबवून परिसरातील महामंडळाच्या गाडीने प्रवास करून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची सोय केली . यावेळी प्रशालेतील मुलींना मोफत एसटी पास योजनेचे विभाग प्रमुख श्री पवार एम.डी ग्रंथपाल व श्री तवटे आर .जी प्रयोगशाळा सहाय्य यांनी प्रशालेतील प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या मुलींचे सर्व प्रकारचे कागदोपत्री कामकाज योग्यरित्या पूर्ण करून मोफत पासची सवलतीची योजना यशस्वी रित्यापूर्ण केली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे यांनी कणकवली डेपो मॅनेजर यांना एसटी बसचे वेळापत्रक व शाळेचे वेळापत्रक यांच्या वेळेचा समन्वय घडून आला तरच विद्यार्थांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळेल अशा सूचना ही देण्यात आल्या . पर्यवेक्षक सौ वृषाली जाधव यांनी आभार मानले .
कणकवली प्रतिनिधी