खारेपाटण येथील सलून व्यावसायिक तरुणाचा प्रामाणिकपणा

एस टी बस स्टॅन्ड येथे सापडलेले पैसे व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन

खारेपाटण येथील सलुन व्यावसायिक युवक साहिल प्रकाश चव्हाण व त्याचा भाऊ हर्ष मुळ रा.धालवली हे नडगिवे येथे सायंकाळी 04:30 वा.चे मानाने टिशु पेपर आनण्यासाठी मोटार सायकलने गेले होते त्याच मुदतीत त्यांना नडगिवे एस.टी.स्टँड चे समोर एक पाकीट मिळाले सदर पाकीटात महत्वाची कागदपत्रे तसेच 2000/- रुपये होती.सदर पाकीट हे साहील यांनी खारेपाटण पोलीस चौकी येथे पोलीस दुरक्षेत्र अंमलदार यांचे स्वाधीन केले त्यानंतर पोलीस नाईक साबळे व साहील यांनी सदर पाकीटातील कागदपत्राची पाहणी केली असता त्यांचे आधारकार्ड वरुन सचिन पांडुरंग राणे रा.आजीवली ता.राजापुर यांचे असल्याचे समजले त्यानंतर साहिल चव्हाण यांचे ओळखीचे आजीवली येथील मित्रांना संपर्क केला असता त्यांनी सदर पाकीट धारकाचा मो.नं.दिला त्यांनतर त्यांना त्यांचे मो.नं वर संपर्क करुन त्यांना बोलावुन घेवुन खात्री केल्यांनतर सदरचे पाकीट त्यांचे ताब्यात देण्यात आले सदर पाकीट देते वेळी पोहवा/चंद्रकांत झोरे हे सुध्दा हजर होते.सदर पाकीट धारक सचिन राणे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी आपण कासार्डे येथे नातेवाईकांकडे गेलो होतो परत गावी आजीवली येथे मोटार सायकलने जात असताना रस्त्यावर कोठेतरी पाकीट पडले होते ते त्यांच्या लक्षात ही नव्हते. साहिल व त्याचा भाऊ हर्ष यांच्या प्रामाणिक पणामुळे राणे यांचे हरवलेले पाकीट त्यांना मिळाले त्याबद्दल राणे यांनी त्या दोघांचे व पोलिसांचे आभार मानले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!